यंदा दिवाळीत ४.२५ लाख कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज

नवी दिल्ली : दसरा आणि नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. देशभरात रामलीला तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आता दिवाळीची लगबग सुरू झाली आहे. यंदा दिवाळीच्या निमित्ताने देशभरात बाजारात तब्बल ४.२५ लाख कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) व्यक्त केला.

ऑक्टोबरअखेरीस दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात देशभर साजरा केला जाईल. घरे तसेच मंडपाची सजावट, दीपमाळा, पूजेचे साहित्य, फुले-फळे, दागिने तसेच खाद्यपदार्थांवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असतो. यामुळे अर्थव्यवस्थेलाही गती मिळते.

कारागिरांनाही लाभ
कॅटचे महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या काळात केवळ मोठ्या दुकानदारांनाच नव्हे तर कारागीर, शिल्पकार, स्वयंपाकी आदींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळतात. हंगामात केलेल्या कमाईवर त्यांचा संपूर्ण वर्षभराचा खर्च चालतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:31 17-10-2024