रोटरी क्लब वुमन्स शॉपिंग फेस्ट चा उद्या होणार भव्य शुभारंभ

रत्नागिरी : रोटरी क्लब रत्नागिरी च्या वतीने 18 ते 20 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळात वुमन्स शॉपिंग फेस्ट चे आयोजन जयेश मंगल कार्यालय थिबा पॅलेस रोड रत्नागिरी येथे करण्यात आले आहे. या भव्य शॉपिंग फेस्ट चे उद्घाटन उद्या सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दिवाळीच्या तोंडावर आयोजित करण्यात आलेल्या या वुमन्स शॉपिंग फेस्टला महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. वुमन्स शॉपिंग फेस्ट मध्ये साडी आणि ड्रेसेस, लहान मुलांचे ड्रेसेस, सिल्वर आणि इमिटेशन ज्वेलरी, बॅग्स आणि पर्सेस, फुड्स, आकर्षक झाडे, आर्ट गॅलरी, हँडमेड कार्पेट अशा असंख्य वस्तूंची भरपूर वरायटी उपलब्ध असणार आहे. महिलांसाठी जणूकाही ही पर्वणीच ठरणार आहे. या शॉपिंग फेस्ट ला जास्तीत जास्त महिलांनी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.