रत्नागिरी : शहरातील नाचणे परिसरात राहणारा तरुण मोरगाव-सुपा पुणे येथून ३ जुलै २०२५ पासून बेपत्ता झाला आहे. याबाबत सुपा पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याबाबत नोंद करण्यात आली आहे.
गणेश प्रकाश कदम (२७, मूळ रा. नाचणे साई किरण व्ह्यू अपार्टमेंट, रत्नागिरी) असे या तरुणाचे नाव आहे. गणेश हा पुणे येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. अधूनमधून तो पुण्यातील त्याची बहीण प्रियांका चव्हाण हिच्याकडे जायचा. तसेच तिला रोज फोन करायचा. ३ जुलै रोजी गणेशने फोन केला नव्हता. म्हणून रत्नाकर चव्हाण यांनी गणेशच्या हॉटेलमध्ये तसेच इतरत्र शोध घेतला असता तो आढळला नाही. प्रियांका आणि पती रत्नाकर यांनी १८ जुलैपर्यंत वाट पाहून मोरगाव-सुपा पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर दिली. गणेशने निळी पॅन्ट व नीळा शर्ट परिधान केलेला असून त्याचा रंग सावळा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:55 AM 02/Aug/2025














