रत्नागिरी : शहरानजीकच्या एमआयडीसी येथील एका कंपनीच्या बाजुला चिऱ्याच्या कुपणाशेजारी बेकायदेशिरपणे गावठी दारु बाळगणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार ३० जुलै रोजी सायंकाळी ७.४५ वा. सुमारास करण्यात आली. राहुल गुलाब तिवारी (वय ३३, रा. एम आय डी सी मिरजोळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याच्या विरोधात पोलिस हेड कॉस्टेबल रुपेश भिसे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, बुधवारी सायंकाळी संशयित हा आपल्या ताब्यात ९५० रुपयांची ९ लिटर गावठी हातभट्टीची दारु विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 02/Aug/2025














