रत्नागिरी : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था संगमेश्वर येथे पीपीपी अंतर्गत असणाऱ्या आय एम सी मार्फत नव्याने चालू करावयाच्या सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) व्यवसायासाठी कंत्राटी निदेशक ही दोन पदे ठोक मानधनावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात भरावयाची आहेत. पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था. संगमेश्वर रामपेठ, सप्तेश्वर रोड, संगमेश्वर यांच्याकडे आवश्यक कागदपत्रासह ७ ऑगस्ट रोजी पर्यंत विनंती अर्ज सादर करावेत, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य र.वि. कोकरे यांनी कळविले आहे.
८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अर्ज सादरु करणाऱ्यांच्या मुलाखती व व्यावसायिक चाचणी होतील व उमेदवारांची निवड करण्यात येईल. या पदासाठी डीजीईटीच्या मानकानुसार शैक्षणिक अर्हता अभियांत्रिकी किंवा तंत्रशास्त्र या मधील विद्युत अभियांत्रिकी विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी व विद्युत क्षेत्रातील किमान एक वर्षाचा अनुभव अथवा विद्युत अभियांत्रिकीमधील किमान द्वितीय श्रेणीतील पदवीका व विद्युत क्षेत्रातील किमान २ वर्षाचा अनुभव अथवा सोलर टेक्निशियन व्यवसायातील आयटी आय परीक्षा उत्तीर्ण व शिकाऊ उमेदवारी उत्तीर्ण तसेच विद्युत क्षेत्रातील किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 AM 02/Aug/2025














