गणपतीपुळे : पुढारी वृत्तसेवा प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू गणपती मंदिरात बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी आश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवाला प्रारंभ झाला आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा दिव्यांचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि धार्मिक वातावरणात दररोज साजरा करण्यात येणार आहे.
दररोज सायंकाळी श्रींची पंचोपचार पूजा करून ७.०० वाजता मंदिरातील सर्व विद्युत पुरवठा व रोषणाई खंडित करून फक्त तेलाच्या दिव्यांनी संपूर्ण मंदिर प्रकाशित करण्यात येत. आरती मंत्रपुष्पांजली सेवा करण्यात येणार आहे. त्यावेळी दिव्यांचा मनोहारी झगमगाट आणि लखलखाट अनुभवता येणार आहे. त्यांनतर प्रसादाचे वाटप करण्यात येऊन त्या दिवसाच्या दीपोत्सवाची सांगता होईल.
महिनाभर चालणाऱ्या उत्सवाची जय्यत तयारी आणि सुसूत्र नियोजन संस्थान श्री देव गणपतीपुळे यांच्यामार्फत प्रतिवर्षी करण्यात येते. यामध्ये अनेक भक्तगण मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात, अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 18/Oct/2024










