मेष – आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल.
वृषभ – आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल.
मिथुन – आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही.
जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क – आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल.
सिंह – आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल.
कन्या – कौटुंबिक सुख – शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल.
तूळ – आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामे सफल बनतील.
वृश्चिक – आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील.
धनु – आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल.
मकर – आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो.
कुंभ – आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा.
मीन – आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. रत्नागिरी खबरदार यातून कोणताही दावा करत नाही. )
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 02-08-2025














