Shyamchi Aai Best Marathi film National Awards announced : भारतातील राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा केंद्र सरकारकडून आज (दि.1) करण्यात आली आहे. श्यामची आई हा सिनेमा ‘सर्वोकृष्ट मराठी चित्रपट’ ठरलाय.
राष्ट्रीय पुरस्कारांची समितीने माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्य मंत्री डॉ. एल. मुरुगन यांना यासंदर्भातील अहवाल सादर केला होता. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत ज्यूरीने विजेत्यांची घोषणा केली.
साने गुरुजींच्या आत्मचरित्रावर आधारित श्यामची आई ही कथा स्वातंत्र्यपूर्व काळातली आहे आणि ती एका आईचं प्रेम तिच्या मुलाच्या दृष्टिकोनातून उलगडते. अमृता फिल्म्स, पुणे फिल्म कंपनी, भालजी पेंढारकर आणि आल्मंड्स क्रिएशन्स प्रस्तुत श्यामची आई (मराठी) हा चित्रपट स्वातंत्र्यसैनिक साने गुरुजींच्या बालपणावर आधारित आहे. हा चित्रपट 1953 साली प्रदर्शित झालेल्या त्याच नावाच्या जुन्या चित्रपटावर आधारित आहे.
साने गुरुजी (ओम भुतकर) तुरुंगात असून आपल्या बालपणाची कहाणी कैद्यांना सांगत आहेत. लहानपणी त्यांना श्याम म्हणून ओळखलं जायचं.
श्याम (शर्वा गाडगीळ) यांचं बालपण खूप कठीण होतं, कारण त्यांच्या वडिलांना (संदीप पाठक), आईला (गौरी देशपांडे) आणि भावंडांना वडिलांच्या भावांनी घरातून हाकलून दिलं होतं. या सगळ्या संघर्षांमधूनही श्यामच्या आईने त्याला चांगले संस्कार दिले. ही कथा साने गुरुजी, म्हणजेच पांडुरंग सदाशिव साने, यांच्या खऱ्या जीवनावर आधारित आहे.
राष्ट्रीय पुरस्कारांत ‘सर्वोत्तम अभिनेत्री’चा पुरस्कार राणी मुखर्जी हिला मिळाला, तर शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना ‘सर्वोत्तम अभिनेत्याचा’ पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, ’12वी फेल’ या चित्रपटाला ‘सर्वोत्तम फिचर फिल्म’चा पुरस्कार मिळाला.
राणी मुखर्जी आणि विक्रांत मेस्सी यांची नावे सर्वोत्तम अभिनेत्री आणि अभिनेता म्हणून अगोदरच चर्चेत होती. मात्र शाहरुख खानने आपल्या ‘जवान’ चित्रपटासाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून चाहत्यांना मोठा सरप्राईज दिला. राणी मुखर्जी, शाहरुख खान आणि विक्रांत मेस्सी यांना हा त्यांचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे.
या तीन कलाकारांव्यतिरिक्त सान्या मल्होत्राच्या ‘कटहल’ चित्रपटाला सर्वोत्तम हिंदी फिचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपटाने साउंड डिझाईन आणि बॅकग्राउंड स्कोअर या दोन विभागांत पुरस्कार पटकावले. अदा शर्माच्या ‘द केरळ स्टोरी’साठी दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. विक्की कौशलच्या ‘सॅम बहादूर’ला सर्वोत्तम मेकअप आणि कॉस्ट्युम डिझाईनचा पुरस्कार मिळाला.
इतर पुरस्कार
विशेष उल्लेख – अॅनिमल
सर्वोत्तम प्रादेशिक चित्रपट – पाई तांग
सर्वोत्तम तेलुगू चित्रपट – भागवत केसरी
सर्वोत्तम तमिळ चित्रपट – पार्किंग
सर्वोत्तम मराठी चित्रपट – श्यामची आई
सर्वोत्तम मल्याळम चित्रपट – उलक्कू
सर्वोत्तम कन्नड चित्रपट – कंदीलु – द रे ऑफ होप
सर्वोत्तम हिंदी चित्रपट – कटहल : अ जॅकफ्रूट मिस्ट्री
सर्वोत्तम गुजराती चित्रपट – वश
सर्वोत्तम बंगाली चित्रपट – डीप फ्रिज
सर्वोत्तम आसामी चित्रपट – रोंगातपु 1982
तांत्रिक विभागातील पुरस्कार
स्टंट कोरिओग्राफी – हनुमान (तेलुगू)
सर्वोत्तम कोरिओग्राफी – ढिंढोरा बाजे रे – वैभवी मर्चंट
सर्वोत्तम गीतलेखन – बालगाम (तेलुगू)
सर्वोत्तम संगीत दिग्दर्शन – वाथी (तमिळ)
सर्वोत्तम बॅकग्राउंड स्कोअर – अॅनिमल – हर्षवर्धन
सर्वोत्तम मेकअप – सॅम बहादूर – श्रीकांत देसाई
सर्वोत्तम कॉस्ट्यूम डिझाइन – सॅम बहादूर
सर्वोत्तम प्रॉडक्शन डिझाईन – 2018: Everyone is a Hero
सर्वोत्तम संपादन (एडिटिंग) – पुकल्लम (मल्याळम)
सर्वोत्तम साउंड डिझाईन – अॅनिमल
सर्वोत्तम पटकथा – बेबी (तेलुगू) आणि पार्किंग (तमिळ)
सर्वोत्तम संवादलेखन – सिर्फ एक बंदा काफी है – दीपक किंगरानी
सर्वोत्तम छायाचित्रण (सिनेमॅटोग्राफी) – द केरळ स्टोरी
सर्वोत्तम महिला पार्श्वगायन – चलिया – शिल्पा राव
सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायन – (अहवालात नमूद नाही)
सर्वोत्तम बालकलाकार
गांधी तथा चेट्टू – सुकृती वेणू बंदरेद्दी
जिप्सी – कबीर खंदारे
नाल 2 – तृषा थोसार, श्रीवानस आणि भार्गव
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 02-08-2025














