मंडणगडचा स्वराज आईनकर राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व

मंडणगड : तालुक्यातील तायक्वांदो खेळाडू स्वराज सुनील आईनकर याने महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन आयोजित ३७ व्या राज्य वरिष्ठ क्युरोगी आणि ११ वी पूमसे तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत ५४ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तो आता ओडिसा येथे ३१ ऑगस्टपासून होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे.

ठाणे येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही तो विजेता ठरला. त्याला दिनांक ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत रोजी ओडिसामध्ये जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियम, कटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे. सध्या स्वराज वॉरियर तायक्वांदो अकॅडमी, सानपाडा येथे मंगेश आवटी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या कामगिरीमुळे त्यांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 02/Aug/2025