रत्नागिरीत भाजपच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप; सामाजिक एकोप्याचा संदेश

रत्नागिरी: भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रेरणेतून रत्नागिरी शहराच्या प्रभाग क्रमांक १४, तेली आळी येथे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात मुस्लिम समाजातील मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला, ज्यामुळे सामाजिक एकात्मतेचा एक चांगला संदेश देण्यात आला.
यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी मुलांना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेण्याचा सल्ला दिला.
कार्यक्रमाला शहराध्यक्ष दादा ढेकणे, प्रमुख पाहुणे उदयजी बसणकर, विक्रम जैन, अमित विलणकर, सत्यवती बोरकर, वैभवी शिवलकर, अज्जू हूनेरकर आणि समीर वस्ता छगन जी छिपा यांची विशेष उपस्थिती होती. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले.