राजापूर : धोपेश्वर पंचक्रोशीतील सुमारे ८० टक्के शेतकरी कुळ असून हे शेतकरी प्रत्यक्ष शेती कसत असले तरी काही तांत्रिक कारणांमुळे त्यांना फार्मर आयडी मिळत नाही, देश आझादी का अमृतमहोत्सव साजरा करीत असताना इथले शेतकरी आजपर्यंत भोगवटदारांच्या गुलामगिरीत जगत आहेत, सातबाऱ्यावर कुळ म्हणून दाखल असलेल्या शेतकऱ्यांनाही फार्मर आयडी मिळावा, या मागणीसाठी धुतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीने १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिला आहे.
याबाबतचे निवेदन श्री धुतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन प्रकाश आमकर यांनी तहसीलदारांना दिले आहे. धुतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के शेतकरी हे प्रत्यक्ष शेती करत आहेत. त्यांची नोंद सातबाऱ्यावर कुळ म्हणून दाखल आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना फार्मर आयडी मिळत नाही. परिणामी या शेतकऱ्यांना शासनाच्या अनेक योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 04/Aug/2025














