दारूच्या नशेत करबुडे येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील करबुडे येथे दारूच्या नशेत वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन तुकाराम चव्हाण (वय ६०, रा. करबुडे पवार कोड, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चव्हाण हे दारूचे व्यसनी होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांनी दारूच्या नशेत राहत्या घरासमोरील अंगणात असलेल्या छपराच्या लोखंडी पोलला इलेक्ट्रीक वायर बांधून गळफास घेतला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 04/Aug/2025