चिपळूण : मार्गताम्हाणे-सुतारवाडीत घरातून चार लाखांचे दागिने चोरीस

चिपळूण : तालुक्यातोल मार्गताम्हाणे-सुतारवाडी येथे एका घरातून ३ लाख ९८ हजारांचे दागिने लंपास झाल्याची घटना २४ ते २६ जुलैदरम्यान घडली आहे. या प्रकरणी दोन महिला तसेच चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पूजा मोहन घोलपकर (५०), सायली तुषार पांचाळ (३०, रत्नागिरी) यांच्यासह एका चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद गजानन आत्माराम कोतवडेकर (६३, मार्गताम्हाणे-सुतारवाडी) यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन कोतवडेकर याच्या राहत्या घरी पूजा घोलपकर, सायली पांचाळ किंवा कोणीतरी चोरट्याने घरात प्रवेश केला. तेथे बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेले ३ लाख ९८ हजार किमतीचे दागिने लंपास केले.

त्यामध्ये २ लाख ४० हजार किमतीचे ६ तोळ्यांचे मंगळसूत्र, ४० हजार किमतीचे १० ग्रॅम वजनाची चेन, १ लाख ८ हजार किमतीचे २७ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार, १० हजार किमतीची २.५ ग्रॅम किमतीची कानातील सोनसाखळी याचा समोवश आहे. हो चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर गजानन कोतवडेकर यांनी त्यांच्या नातेवाईकांकडे विचारपूस करत घरात इतरत्र शोध घेतला असता दागिने न मिळाल्याने अखेर शुक्रवारी या संदर्भात फिर्याद दिली. पूजा घोलपकर, सायली पांचाळ या कोतवडेकर

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 04/Aug/2025