रत्नागिरी : लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीत मधल्याआळीत गोरे यांच्या निवासस्थानी झाला. स्वातंत्र्यानंतर या निवासस्थानाचे टिळक जन्मस्थान स्मारकात रूपांतर करण्यात आले. पुरातत्त्व विभागाकडे याची देखभाल आहे. या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून टिळक पुण्यतिथीनिमित्त गेली पन्नास वर्षे संपूर्ण गीतापठण केले जात आहे. याही वर्षी ही परंपरा जपण्यात आली.
पन्नास वर्षांहून अधिक काळ टिळक जन्मस्थानात संस्कृतमधील गीतापठण केले जाते. नगरपालिकेतर्फे याची व्यवस्था केली जाते. या कार्यक्रमांमध्ये रत्नागिरीतील ज्येष्ठ संस्कृत शिक्षक पूर्वी सहभागी होत असत. गेल्या २८ वर्षांपासून गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच फाटक प्रशालेचे विद्यार्थीही या गीतापठणामध्ये सहभागी होत आहेत. गेल्या वर्षीपासून टिळक आळीतील स्वानंद पठण मंडळाच्या भगिनीसुद्धा यामध्ये सहभागी होऊ लागल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 04-08-2025














