Ratnagiri : सहाय्यक मत्स्य आयुक्तपदाचा दोघांकडे अतिरिक्त कार्यभार

रत्नागिरी : सिंधुदुर्ग-मालवण आणि रत्नागिरी येथील साहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तपदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

तसे आदेश मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाने १ ऑगस्टला जारी केले आहे.

साहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण, सागर कुवेसकर हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सिंधुदुर्गसह रत्नागिरी जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार होता. तो अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. साहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण हा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग-मालवणचे मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी प्रतीक महाडवाला यांच्याकडे देण्यात आला आहे. रत्नागिरी साहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय या पदाचा अतिरिक्त कार्यभार रत्नागिरी मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी जि. द. सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 04-08-2025