रत्नागिरी : सैतवडे येथे गावठी दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या महिलेवर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यतील सैतवडे येथे बेकायदेशीरपणे गावठी दारू विक्रीच्या उद्देशाने आपल्या जवळ बाळगणाऱ्या महिले विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार २ ऑगस्ट रोजी दुपारी २.२५ वा. सुमारास करण्यात आली.

जायीदा अन्वर शेखासन (५८, रा. बोरसई मोहल्ला सैतवडे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात पोलिस हेड कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी दुपारी ही महिला सैतवडे येथील एका बंद घराच्या बाजुला खाडीकिनारी आपल्या ताब्यात ५५० रुपयांची ५ लिटर गावठी दारू विक्रीसाठी बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 04/Aug/2025