संगमेश्वर आयटीआयमध्ये सोलर टेक्निशियन अभ्यासक्रम सुरू

रत्नागिरी : संगमेश्वर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोलर टेक्निशियन हा नवा अभ्यासक्रम सुरू झाला आहे.

ऊर्जेचे पारंपरिक स्रोत दिवसेंदिवस संपत चालले आहेत, त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे.

यामध्ये सौरऊर्जेचा वापर झपाट्याने वाढत असून, सौर पॅनेल, सौर दिवे, सोलर वॉटर हिटर, सौर चूल, सौर कंदील यांसारख्या उपकरणांचा उपयोग सर्वसामान्यांमध्ये वाढताना दिसत आहे.

ही गरज लक्षात घेता संगमेश्वरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी घेऊन आली आहे. संस्थेच्या पीपीपीअंतर्गत आयएमसीमार्फत ‘सोलर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)’ हा अभ्यासक्रम यावर्षीपासून सुरू होत आहे.

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून या नवीन अभ्यासक्रमाची निवड करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन संस्था प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी (०२३५४) २९९३४२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 04-08-2025