लांजा : खेरवसेत रानटी प्राण्यांकडून भाजीपाला, शेतीचे नुकसान

लांजा : जुलै महिन्याच्या अखेरीस पाऊस ओसरला असून श्रावण महिन्यात ऊन-पावसाचा लपांडाव सुरू झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी होताच रानटी प्राण्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीकडे सुरू केला आहे. लांजा तालुक्यातील खेरवसे गावात माकड आणि गव्यांकडून भातशेती व भाजीपाला पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. जून-जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे लांजा तालुक्याच्या ग्रामीण भागातील भात लावणीची कामे पूर्णत्वाला गेली आहेत; मात्र पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होताच भातशेती व भाजीपाला पिकांवर वन्य प्राण्यांची वक्रदृष्टी पडली आहे.

गवे दिवसाढवळ्या लोकवस्तीत शिरून भातशेतीत दिसून येत आहेत. सहा ते आठ गव्यांचा कळप शेतीमध्ये शिरून शेतीचे नुकसान करत आहेत. यासह माकडांचा उपद्रव वाढला असून भात पिके व घरांच्या शेजारील भाजीपाला पिकांचे वन्य प्राण्यांकडुन नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:21 PM 04/Aug/2025