लांजा : तालुक्यातील दाभोळे ते वाटुळ रस्त्यावर असलेल्या कोलेवाडी, जोईलवाडी येथील एका चायनीज सेंटरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत हातभट्टीची दारू जप्त केली आहे. ही कारवाई रविवारी, ३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ४.५० च्या सुमारास करण्यात आली.
लांजा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुयोग रोहिदास यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांनी ‘ओ पप्पा चायनीज सेंटर’ नावाच्या दुकानावर छापा टाकला. या छाप्यात एका महिलेकडून अवैधरित्या विक्रीसाठी ठेवलेली ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळाली. ही दारू एका ५ लिटरच्या प्लास्टिक कॅनमध्ये भरलेली होती. पोलिसांनी दारू आणि कॅनसह एकूण ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १४७/२०२५ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 04-08-2025














