देवरुख पोलिसांकडून दारूविक्री करणाऱ्यावर कारवाई; ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील बामणोली-गुरववाडी येथे देवरुख पोलिसांनी अवैध दारूविक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. रविवारी, ३ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी ही कारवाई करण्यात आली.

याबाबत देवरुख पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार रुपाली सुंदर कुरणे यांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी बामणोली-गुरववाडी येथे बंद खोपटीच्या आडोशाला छापा टाकला. त्यावेळी विजय शंकर सुतार (वय ५०, रा. बामणोली, करंडेवाडी) हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असताना पोलिसांना आढळून आला.

पोलिसांनी त्याच्याकडून ५ लिटर क्षमतेचा प्लास्टिकचा कॅन, त्यामध्ये असलेली ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू आणि एक जुना स्टीलचा ग्लास असा एकूण ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ८६/२०२५ नुसार, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अंतर्गत विजय सुतारविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 04-08-2025