देवरुखातील उज्जैन भस्म आरती देखावा ठरला लक्षवेधी

देवरुख : शहरातील खालची आळी येथील हनुमान प्रासादिक बालमित्र समाज मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवात प्रतिवर्षाप्रमाणे दिंडी काढण्यात आली. या दिंडीत ज्योतिर्लिंगातील महत्त्वाचे उज्जैन येथील महाकालेश्वर भस्म आरती देखावा साकारण्यात आला. दिंडी देवी सोळजाई मंदिरात नेण्यात आली. देखाव्यातील जिवंतपणा सर्वांनाच भावला. प्रतिवर्षी मंडळ शहरात शांतता नांदावी या उद्देशाने दिंडी काढली जाते. या दिंडीला मागील ५५ वर्षांची परंपरा आहे. ही दिंडी खालचीआळी, एसटी स्टॅण्ड, माणिक चौक, दत्तमंदिर मार्गे, सोळजाई मंदिर अशी नेण्यात आली. दिंडीत सोळजाई मातेचा जयजयकार व थोर संतांच्या अभंगांनी परिसर दणाणून सोडला गेला.

यावर्षी उज्जैन महाकालेश्वर ज्योतिर्लिंग भस्म आरती असा देखावा साकारण्यात आला. ही दिंडी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत साळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली. ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण करत काढण्यात आली. मंदिरात दिंडी आल्यावर देवीला गा-हाणे घालून व कलाकार परिचय करुन सांगता करण्यात आली. यामध्ये दिलीप वनकर, देवांश वनकर, दिलीप करंडे, सृजन नलावडे, प्रज्ज्वल राऊत, सार्थक नलावडे, विश्वंभर पवार, विराज माने, स्वरूप नलावडे, शिवम नलावडे, श्रवण नलावडे यांनी भूमिका साकारल्या होत्या. रंगभूषा दत्ता शिंदे, मंगेश नलावडे, संदीप पवार, विलास पवार यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 18/Oct/2024