Ratnagiri : गणेश मूर्तिकारांची रंगकामाची लगबग..

रत्नागिरी : गणरायाच्या आगमनाला अवघे 25 दिवस उरले असून ग्रामीण व शहरी भागांत गणेश मूर्तिकारांची गणपतीला रंगाने सुबक रूप देण्याची लगबग सुरू झाली आहे. राज्य शासनाने प्लास्टरच्या मूर्तीवरील बंदी उठवल्यानंतर मूर्तिकरांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मुर्तीना पॉलीश करणे, रंगविणे अशा अनेक प्रकारची कामे करण्यासाठी स्थानिकांना रोजगार प्राप्त होऊ लागला आहे. विशेष म्हणजे महिला वर्गदेखील ही कामे आवडीने करीत असल्याचे चित्र आहे. वेगवेगळ्या भागातून या मुर्तीना मागणी वाढली असून बुकींग सूरू असल्याचे मुर्तीकाराकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:56 04-08-2025