रत्नागिरी : राजिवड्यात रंगला भैरी-शिवाचा पालखी भेट सोहळा!

रत्नागिरी : एक वर्षाचा तो काळ, पहा त्यांचा बंधूभाव, भेट झाली पहा हो भैरी-शिवाची… श्रावणातील दुसऱ्या सोमवारी रत्नागिरीतील प्रसिद्ध श्रीदेव काशीविश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरीबुवाच्या पालखी भेटीचा सोहळा रंगला. रत्नागिरीत अनेक शिवमंदिरांमध्ये दुसऱ्या श्रावण सोमवारी नामसप्ताहाची सांगता झाली.

श्रावण महिन्यानिमित्त जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. पहिल्या श्रावण सोमवारी अनेक मंदिरांमध्ये नामसप्ताहास प्रारंभ झाला होता. दुसऱ्या श्रावण सोमवारी दुपारी या नामसप्ताहाची सांगता झाली. काळबादेवी येथील रामेश्वर मंदिर, मिरजोळे येथील सिद्धेश्वर मंदिर, मुरुगवाडा येथील श्रीदेव भैरव मंदिरात नामसप्ताहाची सांगता झाली. सोमेश्वर येथील सोमेश्वर मंदिरात दुसऱ्या सोमवारी नामसप्ताहास प्रारंभ झाला. रत्नागिरीतील प्रसिद्ध अशा श्रीदेव काशी विश्वेश्वर आणि मांडवी येथील श्रीदेव भैरवाच्या पालखी भेटीचा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी भाविकांनी केली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 05/Aug/2025