युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC) द्वारे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) मध्ये एन्फोर्समेंट ऑफिसर (EO), अकाऊंट्स ऑफिसर (AO) आणि असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर (APFC) या पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती निवड प्रक्रियेद्वारे होणार असून, एकूण २३० जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२५ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी https://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
रिक्त पदांचा तपशील आणि पात्रता
१. एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाऊंट्स ऑफिसर
- एकूण पदे: १५६ (अजा-२३, अज-१२, इमाव-४२, ईडब्ल्ड्यूएस-१, खुला-७८)
- दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव: ९ पदे
- पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण (१७ मार्च २०२३ पर्यंत)
- वयोमर्यादा: ३० वर्षे (१८ ऑगस्ट २०२५ पर्यंत)
- वेतन: पे-स्केल लेव्हल ८, अंदाजे वेतन ₹९२,२००/- प्रति महिना.
२. असिस्टंट प्रॉव्हिडंट फंड कमिशनर (APFC)
- एकूण पदे: ७४ (अजा-७, इमाव-२८, ईडब्ल्ड्यूएस-७, खुला-३२)
- दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव: ३ पदे
- पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
- इष्ट पात्रता: कंपनी लॉ/लेबर लॉ/पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये डिप्लोमा असल्यास प्राधान्य.
- वयोमर्यादा: ३५ वर्षे (१८ ऑगस्ट २०२५ पर्यंत)
- वेतन: पे-स्केल लेव्हल १०, अंदाजे वेतन ₹१,१३,२००/- प्रति महिना.
वयोमर्यादेत सूट:
- इतर मागासवर्गीय (OBC): ३ वर्षे
- अनुसूचित जाती/जमाती (SC/ST): ५ वर्षे
- दिव्यांग उमेदवारांसाठी: १० ते १५ वर्षांपर्यंत सूट
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत होईल: लेखी परीक्षा आणि मुलाखत.
लेखी परीक्षा:
- स्वरूप: पेन आणि पेपर मोड, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत वस्तुनिष्ठ (Objective) बहुपर्यायी प्रश्न (MCQ) असतील.
- वेळ: २ तास
- नकारात्मक गुण: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.
अभ्यासक्रम:
- जनरल इंग्लिश, भारतीय संस्कृती, वारसा आणि स्वातंत्र्य चळवळ
- गव्हर्नन्स आणि भारतीय संविधान
- भारतीय अर्थव्यवस्थेतील विकासात्मक मुद्दे आणि सद्यस्थिती
- अकाऊंटन्सी, ऑडिटिंग आणि इन्शुरन्सची मूलभूत तत्त्वे
- संगणक अनुप्रयोग आणि सामान्य विज्ञानाचे मूलभूत ज्ञान
- प्राथमिक गणित, स्टॅटिस्टिक्स आणि जनरल मेंटल ॲबिलिटी
- भारतातील औद्योगिक संबंध, कामगार कायदे आणि सामाजिक सुरक्षा
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी
लेखी परीक्षेतील पात्रतेचे निकष:
- खुला/ईडब्ल्यूएस: किमान ५०% गुण
- इमाव: किमान ४५% गुण
- अजा/अज: किमान ४०% गुण
मुलाखत:
- लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना १०० गुणांची मुलाखत द्यावी लागेल.
- अंतिम निवड करताना लेखी परीक्षा आणि मुलाखतीचे गुण ७५:२५ या प्रमाणात विचारात घेतले जातील.
अधिक माहितीसाठी किंवा तांत्रिक मदतीसाठी, उमेदवार हेल्पलाईन क्रमांक ०११२४०४१००१ (सकाळी १० ते संध्याकाळी ५.३०) किंवा upscoap@nic.in या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकतात.













