दापोली : ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे काळी फित लावून निषेध आंदोलन

दापोली : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात दोन ऑगस्टरोजी पार पडलेल्या प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी पत्र वाटप कार्यक्रमावेळी ग्रामविकास राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत सोमवारी (ता. ४) दापोली तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी काळी फित लावून कामकाज केले.

राज्यभरातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमध्ये सध्या तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मंत्र्यांकडून केलेल्या वक्तव्याचा अधिकाऱ्यांच्या मानसिकतेवर प्रतिकूल परिणाम झालेला आहे.

ग्रामपंचायत राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनतर्फे निषेधासाठी राज्यभर काळी फित आंदोलनाचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर दापोली तालुक्यातील अधिकाऱ्यांनी एकत्र येत दापोली पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना निषेधाचे निवेदन सादर केले. व प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्याने काळी फित लावून पंचायत समितीमध्ये एकत्र येऊन निषेध नोंदवला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 05/Aug/2025