रत्नागिरीत एनसीसीतर्फे पूर्व सागरी नौकाभ्रमण शिबिर

रत्नागिरी : प्रतिवर्षांप्रमाणे २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीतर्फे पूर्व सागरी नौकाभ्रमण शिबिराला रत्नागिरीत सुरवात झाली. हे शिबिर २४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

नौकाभ्रमण शिबिरात २ नेव्ही ऑफिसर, ८ नेव्ही कर्मचारी, २ एनसीसी ऑफिसर व महाराष्ट्रातून १२० राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट सहभागी झाले आहेत. यातील ६० कॅडेटची निवड पुढील राष्ट्रीय स्तरावरील सागरी नौकाभ्रमण शिबिर २०२५ साठी करण्यात येणार आहे. ५ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत रत्नागिरी ते जयगड या बंदरापर्यंत ही सागरी नौकाश्रमण मोहीम आखण्यात आली आहे. या शिबिरात पुणे, मुंबई अ, मुंबई ब, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरमधून राष्ट्रीय छात्रसेनेचे कॅडेट सहभागी होणार आहेत. २ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कमांडर के. राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 AM 18/Oct/2024