रत्नागिरी : जिल्ह्यातील व्यावसायिक फोटोग्राफर अधिक प्रगत व प्रशिक्षित व्हावेत, संघटित व्हावेत, यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडीओग्राफर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या सिनेमॅटिक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
असोसिएशनतर्फे विविध कार्यशाळांचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षात ५०० कार्यशाळा आणि दोनशे वेबिनार यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ही कार्यशाळा पार पडली.
रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर असोसिएशन आणि चिपळूण तालुका असोसिएशनतर्फे आयोजित सोनी इंडिया तसेच सांगलीतील सन आर्ट ग्रुप सारडा यांच्या सौजन्याने चिपळूण येथील रीम्स हॉटेल येथे तर रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी तालुका यांच्या सहकार्याने हेच वर्कशॉप रत्नागिरी येथील हॉटेल सी फॅन येथे यशस्वीरीत्या पार पडले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 05-08-2025














