रत्नागिरी : कोकणात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर आता काहीकाळ पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यासह साथीच्या आजाराची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच रत्नागिरी शहरात दूषित पाण्यामुळे आजारांनी डोके वर काढले आहे.
अतिसार, जुलाब, सर्दी, ताप, उलट्या आणि पाण्यामुळे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखाने रुग्णांच्या गर्दनि हाऊसफुल्ल होत आहेत. नागरिकांनी स्वच्छता आणि सुरक्षित पाण्याच्या वापरासंबंधी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळा आला की साथीचे आजार पसरण्याचा धोका दरवर्षी निर्माण होतो. यंदाच्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जिल्ह्यात साथीचे आजार पसरले असून सिव्हिलबरोबरच खासगी दवाखान्यात उपचारासाठी रुग्णांची मोठी गर्दी होत आहे.
बदलत्या हवामानामुळे, दूषित पाण्यामुळे लहानमुलांमध्ये थंडी, ताप, उलट्या, जुलाब तसेच डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनियासह विविध आजारांमुळे दवाखान्यात गर्दी होत आहे. शहरातील विविध दवाखान्यांत रुग्णांनी अतिसार, जुलाब आणि पचनाशी संबंधित तक्रारींसाठी उपचार घेतले आहेत. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक असून, अनेक रुग्णांना ताप व अशक्तपणाही जाणवत आहे.
दुषित पाणी, उघड्यावर मिळणारे अन्न आणि पावसामुळे साचलेले पाणी या आजारांच्या प्रसारास कारणीभूत ठरत आहेत, शाळकरी मुलांमध्येही हा आजार वाढत आहे.
दरम्यान, नागरिकांनी ताजे अन्न खावे, दुषित पाणी टाळावे, कोणताही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मोठा पाऊस झाल्यामुळे अंगणात, कुंड्यात, जुन्या वस्तूत, टायर, टेरेससह विविध ठिकाणी पाणी साचलेले असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डास वाढतात व आजार होतात.
मोठा पाऊस झाल्यामुळे अंगणात, कुंड्यात, जुन्या वस्तूत, टायर, टेरेससह विविध ठिकाणी पाणी साचलेले असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणत डास वाढतात व आजार होतात.
पावसाळ्यात साथीचे आजार वाढत आहेत. विशेषता डेंग्यू, मलेरिया होऊ नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. डेंग्यूचे मच्छर स्वच्छ पाण्यात आढळतात. पाणी साठवू नये, नागरिकांनी एक दिवस कोरडा दिवस पाळावा. ताप, सर्दी यासह विविध लक्षणे आढळल्यास तातडीने दवाखान्यात दाखवावे- डॉ. विकास कुमरे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:51 AM 05/Aug/2025












