लांजाचा सुपुत्र सुशांत आगरे याची सुवर्णमय कामगिरी!

लांजा : लांजा तालुक्याचा सुपुत्र सुशांत सोनू आगरे याने छत्तीसगड येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत ६७.५०० किलोग्रॅम वजनी गटात २२५ किलोग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे .

तसेच स्ट्रॉंग मॅन किताब देखील त्याने पटकावला.

लांजा तालुक्यातील रावारी गावचा सुपुत्र असलेला सुशांत आगरे याने आपल्या अतुलनीय कामगिरीने आपल्या गावासह लांजा तालुक्याचे नाव संपूर्ण देशभरात रोशन केले आहे .

आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील सुशांत सोनू आगरे याने केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड मेहनत ,जिद्द ,चिकाटी या जोरावर आपले उचित ध्येय साध्य केले आहे. दिनांक ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ रोजी छत्तीसगड बिलासपूर येथे झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग ( डेड लिफ्ट) चॅम्पियन स्पर्धेत सुशांत आगरे याने ६७.५०० किलोग्रॅम वजनी गटांमध्ये २२५ किलो ग्रॅम वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे .तसेच इंडिया बेस्ट लिफ्टर म्हणजेच स्ट्रॉंग मॅन किताब देखील त्याने पटकावला आहे .

त्याचप्रमाणे २८ नोव्हेंबर २०२५ रोजी गुवाहाटी (आसाम )येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेसाठी देखील भारत संघाकडून सुशांत आगरे याची निवड झाली आहे .

अशाप्रकारे नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या लांजा तालुक्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर चमकवणाऱ्या सुशांत सोनू आगरे याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 05-08-2025