चिपळूण : कोंढे मार्गावर जीवघेणा खड्डा

चिपळूण : चिपळूण-गुहागर मार्गावर कोंढे जुनी मराठी शाळा बस थांब्यानजिक मोठा खड्डा पडला आहे. पावसाळ्यात या खड्यांमध्ये पाणी साचत असल्याने खड्याचा अंदाज न आल्याने काही दुचाकीस्वारांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे येथील ग्रामस्थ श्री. कुळे यांनी या खड्यात खडीने भरलेले पोते टाकून वाहनचालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

चिपळूण-गुहागर मार्गावर अनेक ठिकाणी असे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागते. कोंढे येथेही अशाचप्रकारचा खड्डा पडल्याने वाहनचालकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. कोंढे जुनी मराठी शाळा एसटी थांबा येथेही खड्डे आहेत. ज्यामुळे येथील रहिवाशांनाही याचा त्रास होत आहे. मोठे वाहन खड्ड्यातून वेगाने गेल्यास मोठा आवाज होत असल्याने रहिवाशांनी हे खड्डे भरण्याची मागणी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:58 AM 05/Aug/2025