दापोली : घरकूल डेमो इमारतीची सिमेंट फासून वरवर दुरुस्ती

दापोली : लाभार्थ्यांना घरकूल बांधताना लावले जाणारे निकष याबाबत खासदार सुनील तटकरे यांच्या मागील आढावा बैठकीत दापोली पंचायत समिती अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. यावेळी दापोली पंचायत समिती आवारात बांधलेल्या घरकूल डेमो इमारतीची चर्चा झाली. या बाबत आढावा बैठकीत बांधलेली घरकूल डेमो इमारत, इमारतीला करण्यात आलेला चार लाखांचा खर्च आणि डेमो इमारतीला गेलेले तडे ही बाब पत्रकारांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. लाभार्थ्यांना १ लाख २० हजार अनुदान मग चार लाख डेमो इमारतीवर खर्च कशाला या बाबत बैठकीत जोरदार चर्चा झाली.

खासदार यांच्या आढावा बैठकीत डेमो बाबत झालेली चर्चा त्या नंतर त्या डेमोची दुरुस्ती होणे अपेक्षित होते; मात्र दुरुस्ती झाली नाही. या डेमो इमारतीत शासकीय कामकाज चालते तर काही दुर्घटना होऊ नये तरी या डेमो इमारतीची दुरुस्ती करा असे पत्रकार यांनी दापोली गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले. त्या नंतर पत्रकार यांची तक्रार आहे म्हणून त्या डेमोची दुरुस्ती करा,
असे पत्र गटविकास अधिकारी यांनी बांधकाम विभागाला दिले. त्या नंतर या डेमोची संबंधित ठेकेदार यांनी सिमेंट फासून दुरुस्ती केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 05/Aug/2025