गुहागर : जनतेला शिधापत्रिकेपासून ते विविध दाखले देण्याचे काम महसूलमार्फत होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना नेत त्यांची अंमलबजावणी करण्याचे काम महसूल विभाग करतो. म्हणूनच महसूल विभाग हा शासनाचा कणा आहे, असे प्रतिपादन गुहागरचे तहसीलदार परीक्षित पाटील यांनी केले.
गुहागर महसूल विभागाच्या वतीने महसूल सप्ताहाची सुरुवात १ ऑगस्ट रोजी महसूल दिनाने करण्यात आली. गुहागर शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहामध्ये तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी गुहागर तहसील कार्यालयातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले, तर उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार, लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व दाखले वाटप असा कार्यक्रम पहिल्या दिवशी घेण्यात आला. महसूल अधिकारी राजेश कोळवणकर यांनी महसूल सप्ताहाची प्रस्तावना केली. त्यानंतर लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यामध्ये निवडणूक नायब तहसीलदार स्नेहल मेहता, महसूल नायक तहसीलदार महेंद्र सावर्डेकर, सहाय्यक महसूल अधिकारी राजेश कोळवणकर, जयवंत कदम, सचिन गवळी, महसूल सहाय्यक सुभाष कदम, अक्षय संखे, सुनील वराडकर, मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, अनिल राठोड, आनंद काजरोळकर, ग्राम महसूल अधिकारी विनोद जोशी, प्राची घाणेकर, अविनाश कदम, आकाश बरकडे, शिपाई प्रियांका मोरे, महसूल सेवक प्रकाश बोडेकर, अमित जोशी, श्रुतिका आदवडे, संगणक परिचालक प्राची आरेकर, वृषाली महाडिक, सिद्धी साखरकर, अरविंद पड्याळ यांचा समावेश आहे.
कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सत्कार करताना इयत्ता दहावीमध्ये ९२.८०% गुण मिळवलेली मैत्रेही शिंदे, ८५ टक्के गुण मिळवलेली शौर्या पवार, ८४.२०% गुण मिळवलेली पूर्वा शिंदे, कोकण विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२४ २५ मध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणून यश मिळवलेले बॅडमिंटन आणि खोखो गोल्ड मेडल मंडळ अधिकारी प्रीती रेवाळे, टेबल टेनिस सिल्वर मेडल ग्राम महसूल अधिकारी प्राची घाणेकर, कबड्डीत पहिला क्रमांक, धावणेत तिसरा क्रमांक प्राप्त महसूल सेवक अभिषेक मयेकर, खोखो व सांस्कृतिकमध्ये महसूल सेवक पंकज आग्रे आणि खोखो गोल्ड आणि रनिंग रिले सिल्वर महसूल सेवक श्रुतिका आदवडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार परीक्षित पाटील, महसूल नायब तहसीलदार विद्याधर वैशंपायन, निवडणूक नायब तहसीलदार स्नेहल मेहता, पुरवठा निरीक्षक भावना दोताळे उपस्थित होते. महसूल अधिकारी कोळवणकर यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 PM 05/Aug/2025














