खेड : वेरळ येथील अपार्टमेंटमध्ये हिटरमुळे आग

खेड : तालुक्यात वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व निवासी वसाहतीत परिसरातील गोदावरी अपार्टमेंटमध्ये ४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागण्याची घटना घडली. पाणी गरम करण्यासाठी ठेवण्यात आलेला हिटर सतत चालू राहिल्याने हिटर आणि लाईटचे बोर्ड जळून गेले.

घटनेची माहिती मिळताच खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, विद्युत जोडणी जळून गेल्याने काही प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. घटनेचे नेमके कारण शॉर्ट सर्किट असल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात असून, स्थानिक प्रशासन आणि महावितरणकडून पंचनामा करण्यात येत आहे. वेरळ परिसरात या घटनेनंतर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अशा घटना टाळण्यासाठी विजेच्या उपकरणांचा वापर करताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे, काम झाल्यावर बटणे बंद करणे अवश्य आहे, असे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:37 PM 05/Aug/2025