दापोली : लाडघर येथील वरचा मोहल्ला परिसरात स्नेहल सुभाष भोळे (वय ५१) हे बेशुद्ध अवस्थेत सापडले. ४ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या विजेच्या पोलजवळ ते आढळून आले. भोळे हे मूळचे लाडघर येथील असून इलेक्ट्रिशनचे काम करत होते आणि एकटेच राहत होते.
स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून रात्री ८:२८ वाजता नोंद करण्यात आली असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दापोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 PM 05/Aug/2025














