चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर कळंबे फाटा येथे ४ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी संशयास्पद परिस्थितीत एक इनोव्हा गाडी आढळून आली. या प्रकरणी खलील महमूद खोत (वय ४४, रा. कळंब असते) याच्यावर चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान सिल्व्हर रंगाची टोयोटा इनोव्हा (क्र. MH-04-CT-0264) ही गाडी त्याच्या ताब्यात आढळून आली. मालकी हक्काबाबत विचारले असता खोत समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे सदर गाडी चोरीची असल्याची खात्री पटल्यावर, शाखेच्या वतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
त्यानुसार चिपळूण पोलिसांनी रात्री ८:२९ वाजता गुन्हा नोंदवून सुमारे दोन लाख रुपये किमतीची गाडी जप्त केली आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:49 PM 05/Aug/2025














