रत्नागिरी : जिल्ह्यात ३१ जुलैअखेर ५ लाखांहून अधिक रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी करून घेतली आहे. आता मशिनद्वारे ई-केवायसी करण्याची मुदत संपली असली, तरी मेरा केवायसी व आधार फेस आरडी सव्र्व्हस अॅप या मोबाईल अॅपद्वारे रेशनकार्डला ई-केवायसी होत असून, राज्यभरातील कार्डधारक या अॅपचा वापर करीत आहेत. जिल्ह्यातील ६६ जणांनी एकाच दिवशी ई-केवायसी केली आहे. अद्याप २ लाख ७० हजार १०८ कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही.
जरी मुदत संपली असली तरी जिल्ह्यासह राज्यभरातील रेशनकार्डधारकांनो मोबाईल अॅपचा वापर करून आपली ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी, अन्यथा धान्य बंद होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरात रेशन दुकानांसाठी ई-केवायसी काम महत्वाचे आहे. केवायसी करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत होती. त्यामुळे जिल्ह्यात तब्बल ५ लाखांहून अधिक रेशनधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. तर २० हजारांहून अधिक जणांची ई-केवायसी रिजेक्ट करण्यात आली आहे, तर ३ लाख ६६ हजार ७२८ आधार पडताळणी पेंडींग आहे.
केवायसीची मुदत संपली असून, अद्याप शासनाकडून मुदतवाढीची तारीख जाहीर झालेली नाही. मात्र आता दोन केवायसी पूर्ण केली आहे. त्यामुळे ज्या रेशनकार्ड धारकांनी ई-केवायसी बाकी आहे त्यांनी दोन मोबाईल अॅपचा वापर करून ई-केवायसी पूर्ण प्रक्रिया करावी मोबाईल अॅपद्वारे रेशनकार्ड धारक ई-केवायसी करीत आहेत. जिल्ह्यातील ६६ जणांनी ई-केवायसी
असेही आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले असेही आवाहन जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले.
राज्यभरातून अॅपद्वारे होतायेत ई-केवायसी
राज्यभरातील रेशनकार्ड धारकांनी मोबाईल अॅपद्वारे ई-केवायसी पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. एकाच दिवशी २ हजार ६४७ जणांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक, रायगड, सोलापूर, सिंधुदुर्गसह इतर जिल्ह्यात मोबाईलद्वारे ई-केवायसी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:59 PM 06/Aug/2025














