लांजा : विहिरीत पडून वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू

लांजा : तालुक्यातील गवाणे मावळतवाडी येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवार, ४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. गवाणे मावळतवाडी येथील गंगा सदू घवाळी (८०) या घरी एकट्याच राहत होत्या.

त्यांच्या मुलींची लग्न झालेली आहेत तर मुलगा कामानिमित्त मुंबई येथे राहतो. रविवारी रात्री किंवा सोमवारी पहाटे घराशेजारच्या विहिरीत त्या पडल्या. हा प्रकार नेमका कधी झाला, हे कोणाला समजले नाही. सोमवारी सकाळी शेजारी राहणारी महिला त्यांना न्याहारी देण्यासाठी गेल्या असता त्यांना गंगा आजी घरात दिसल्या नाहीत. शेजारी शोध घेतला असता शेजारी असलेल्या विहिरीत त्या पडल्याचे दिसले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 05/Aug/2025