राजापूर : रायपाटण येथील श्री वडचाई व्यायाम शाळा व क्रीडा प्रसारक मंडळाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून (१५ ऑगस्ट) रायपाटण येथे तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा १७बयोगट (वजन ५० किलो) मुलांसाठी असणार आहे. विजेत्या संघाला रोख रुपये पाच हजारसह चषक व प्रशस्तीपत्र, उपविजेत्या संघाला रोख रुपये तीन हजारसह चषक आणि प्रशस्तीपत्रक, तृतीय क्रमांकाच्या संघाला २ हजार रुपयांसह चषक व प्रशस्तीपत्रक दिले जाईल.
याव्यतिरिक्त उत्कृष्ट चढाई व पकड करणाऱ्या खेळाडूला प्रत्येकी एक हजार रुपये रोख, चषक व प्रशस्तीपत्रक दिले जाईल. तसेच स्पर्धेतील सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुक शालेय संघानी १० ऑगस्टपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी मंगेश पराडकर, किशोर गुरव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दामोदर लिंगायत व सचिव अशोक शेट्ये यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 05/Aug/2025














