चिपळूण : डीबीजे महाविद्यालयात ‘लैंगिक छळ व जागरूकता’ बाबत मार्गदर्शन

चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे वरिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्षतर्फे ‘लैंगिक छळ व जागरूकता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. चिपळूणच्या पोलिस निरीक्षक अनुराधा मेहर यांनी यावेळी व्याख्यानातून मार्गदर्शन केले.

समाजात वावरत असताना महिलांवर लैंगिक छळातून कसे शोषण होते, हे शोषण रोखण्यासाठी कायद्यात असलेल्या तरतुदींची माहिती पीएसआय मेहर यांनी दिली. सध्या सायबर क्राईमच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यासाठी मुलींनी मोबाईल फोन वापरताना काय काळजी घ्यावी हेदेखील सांगितले.

या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. माधव बापट, महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. प्रिया काटदरे तसेच महिला विकास कक्षाच्या सहकारी सई सुर्वे, प्रा. अतूफर नाईक, प्रा. शिल्पा भिडे, प्रा. प्रतीक्षा चिपळूणकर, प्रा. अर्चना कांबळे आदींची उपस्थिती होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 18/Oct/2024