रत्नागिरी : निवळी, हातखंबा अपघातप्रकरणी दोन्ही गॅस टँकर चालकांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी बेदरकारपणे टँकर चालवून अपघात केल्याप्रकणी दोन टँकर चालकांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातांच्या या घटना सोमवार 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6.15 ते 9 वा. कालावधीत घडल्या आहेत.

हरिश्चंद्र राजकुमार पटेल (रा. जीरकपूर जि. जवतपूर, उत्तरप्रदेश) आणि सय्यद अबुतागीर ओलीम (62, रा. तामिळनाडू) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन टँकर चालकांची नावे आहेत. यातील हरिश्चंद्र हा आपल्या ताब्यातील गॅस टँकर (टीनएन-88-एल-9661) घेउन जयगड ते बेंगलोर अस जात होता. तो रावणंगवाडी तिसंगा येथील वळणावर असता त्याचा वळणावर टँकरवरील ताबा सुटला आणि तो उलटून अपघात झाला. तर दुसऱ्या घटनेत सय्यद ओलीम हा आपल्या ताब्यातील गॅस टँकर (केए-01-एजी-8447) घेउन जयगड ते बेंगलोर असा जात होता. तो हातखंबा हायस्कुलजवळील वळणदार उतारा आला असता सय्यदचा टँकरवरील ताबा सुटला आणि त्याने समोरील टॅम्पो ट्रॅव्हलर (एमएच-07-एजे-1134) तसेच हायस्कुलजवळील दोन चहा टपऱ्या आणि बाजूच्या चार दुचाकींना धडक देत अपघात केला. याप्रकरणी दोन्ही दुचाकी चालकांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 281,125 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:36 PM 05/Aug/2025