‘कार रो-रो’ सेवा चाकरमान्यांसाठी त्रासाचीच

चिपळूण : कोकण रेल्वेने गणपतीसाठी कोलाड ते वेर्णा या स्थानकादरम्यान ‘कार रो-रो’ सेवा जाहीर केली आहे. या सेवेसाठी मुंबईतून वाहनाने कोलाडला जावे लागेल आणि येथून गाडी थेट गोव्यात उतरवावी लागेल. ही सेवा अन्य कोणात्याही स्थानकावर मिळणार नाही. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना या सेवेचा कोणताही फायदा होणार कही. त्यामुळे या सेवेऐवजी अतिरिक्त एक्स्प्रेस चालवावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

कोकण रेल्वेच्या कार रो-रो सेवेत चारचाकी वाहने सीड करण्यासाठी मुंबईमधून १०० किलोमीटर अंतर पार करून तीन तास आधी कोलाड रेल्वेस्थानकावर पोहोचावे लागणार आहे. चारचाकी उत्तरवण्यासाठी कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांना वेर्णा येथे जावे लागेल, तिथून साधारण १० तास वेळ वाया बालबाबा लागेल. या सेवेमुळे चाकरमान्यांना वेळेत कसे पोहोचता येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कार रो-रो गोव्यात पोहोचण्यासाठी १२ तास लागतील. कुटुंबातील पाच सदस्यांचा कोकणात येण्यान कार प्रवास पाच ते सहां हजार रुपयांत होतो.

मात्र, रो-रो कार सेवेचे भाडे ७ हजार ८७५ जीएसटीसह) आकारले जाणार आहेत. कारसोबत जाणाऱ्यांनाही अतिरिक्त तिकीट काढून जावे लागणार आहे. त्यामुळे नाकापेक्षा मोती जड अशी स्थिती होणार आहे. तसेच कार रो-रो सेवेसाठी लागणारे रेल्वेचे मनुष्यबळ, सेवेसाठी लागणारा वेळ, मार्ग उपलब्ध न होणे या कारणामुळे, तसेच जादा भाडयामुळे या सेवेला प्रतिसाद मिळणे कठीण आहे. त्यामुळे सेवा रद्द करून, अधिकाधिक प्रवासी विशेष रेल्वेगाडा चालवाव्यात, त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल.

वेळापत्रकावर विपरीत परिणाम
एका वाहनामागे फक्त ३ प्रवाशांची अट अव्यवहार्य आहे. गणपतीसारख्या सणामध्ये कुटुंबात ५ ते ७सदस्य एकत्र प्रवास करतात. फक्त ३ प्रवाशांना परवानगी असल्याने उर्वरित सदस्यांसाठी स्वतंत्र प्रवासाची व्यवस्था करावी लागेल, रो-रो सेवा चालवण्यासाठी लोको पायलट, सहाय्यक लोको पायलट, ट्रेन व्यवस्थापक यांचा स्वतंत्र ताफा लागतो.

एका रेल्वेत ४० वाहने आणि १२० प्रवाशांचीच वाहतूक होणार आहे. २३ ऑगस्ट ते १९ सप्टेंबरदरम्यान एक दिवस आड करून दहा दिवस ही सेवा वालविण्यात येणार आहे. म्हणजे ट्रेन फुल्ल झाली तरीही त्या कालावधीत एकूण १२०० जणच प्रवास करू शकतील. त्याऐवजी जर एक्स्प्रेस चालवली तर, याच कालावधीत सुमारे ३२ हजार प्रवासी प्रवास करू शकते असते-संतोष कदम, चिपळूण

रस्ते मार्गे कोलाड-वेर्णा प्रवासासाठी सध्या १० ते १२ तास लागतात. तर, रो-रो सेवेमुळे रेल्वेने १२ तास लागतात. मात्र, तीन तासांपूर्वी पोहोचणे आणि गाठी तोडिंगची आवश्यकता असल्याने, एकूण वेळेची बचत होत नाही. तसेब त्यासाठीचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नाही-अक्षय महापदी, सचिव अखंड कोकण रेल्वे संघर्ष समिती

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:02 PM 05/Aug/2025