पुन्हा एकदा महेश मिलके स्विमिंग ग्रुप ची चमकदार कामगिरी

रत्नागिरी : नुकत्याच दि.१६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सातारा येथे पार पडलेल्या शालेय विभागीय जलतरण स्पर्धेमध्ये रत्नागिरी जिल्ह्याकडून विविध शाळांमधून महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या सुमारे २३ खेळाडूंची निवड झाली होती. व विभागीय स्पर्धेमध्ये अतिशय चुरशिच्या खेळामध्ये महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या ८ खेळाडूंची राज्यस्तरीय जलतरण क्रीडास्पर्धेकरिता निवड झाली असून सुमारे ५/६खेळाडूंना अतिशय चुरशिच्या स्पर्धेमध्ये सेकंदच्या काही भागामध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. विभागीय स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

Under 14 boys

1)रुद्र सत्यजित दरेकर
50m freestyle प्रथम
50m breaststorck तृतीय

Under 14 girls

1)कार्तिकी प्रकाश भुरवणे
50m butterfly प्रथम
200m IM प्रथम
100m butterfly द्वितीय

2)निधी शरद भिडे
50m breaststorck प्रथम
100m breaststorck द्वितीय
200m breaststorck प्रथम

3)राजनंदिनी आनंद कीर
50m freestyle तृतीय
100m freestyle तृतीय
200m freestyle द्वितीव

4)सई नितीन जाधव
200m breaststorck तृतीय

Under 17 boys

1) योगेंद्र गिरीधर तावडे
50m butterfly प्रथम
50m freestyle द्वितीय
200m freestyle तृतीय

2) चैतन्य सुजाता कदम
200m breaststorck तृतीय
50m breaststorck तृतीय

3)आयुष अजय काळे
50m backstorck तृतीय

Under 19 girls

1)सानवी सतीश पवार
200m breaststorck द्वितीय
100m breaststorck तृतीय

2) युगा वणजु
200m freestyle द्वितीय

Under 19 boys

1)सर्वज्ञ दैवत कडगावे
200m freestyle द्वितीय
1500m freestyle द्वितीय

2) यश मनीष कीर
400m freestyle तृतीय

सदर खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्याचे प्रसिध्द राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक श्री. महेश शंकर मिलके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून आजपर्यंत च्या इतिहासात रत्नागिरी जिल्ह्यातील ८ ते १० खेळाडू राज्यस्तरावर निवड होऊन खेळण्यासाठी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्रशिक्षक महेश मिलके यांनी सुमारे६वर्षे पूर्वी आधुनिक जलतरणाचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केल्यापासून पहिल्या वर्षी(२०१९/२०) रत्नागिरी जिल्ह्याकडून ३ खेळाडू राज्यस्तरावर निवड झाले होते. त्यानंतर सुमारे दोन वर्षे कोरोना काळामध्ये जलतरण स्पर्धा झाल्या नव्हत्या व सन २०२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ५ खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली होती. २०२३ साली महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या६खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली होती. व २०२४रोजी उच्यांक गाठत ८ खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवडण्यात आले असून सुमारे५/६ खेळाडू फक्त सेकंदाच्या काही भागांमध्ये त्यांना तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे.

एकंदरीत प्रशिक्षक महेश मिलके यांचा चढता आलेख पाहता रत्नागिरी जिल्ह्यात ५० मीटर चा जलतरण तलाव उपलब्ध झाल्यास व त्या ठिकाणी प्रशिक्षक महेश मिलके यांना रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रशिक्षक म्हणून संधी दिल्यास पुढील काळात रत्नागिरी जिल्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू निर्माण होतील व रत्नागिरी जिल्ह्याचे नाव जागतिक स्तरावर उंचावून ठेवतील अशी आशा रत्नागिरी जिल्ह्यातील तमाम पालक वर्ग व खेळाडूंमधून व्यक्त केली जात आहे.

सर्व विजयी खेळाडू यांचे रत्नागिरी जिल्ह्यात कौतुक केले जात असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच राष्ट्रीय खेळाडू व प्रमाणपत्र प्राप्त प्रशिक्षक महेश मिलके यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून सातारा जलतरण तलाव या ठिकाणी महेश मिलके स्विमिंग ग्रुप च्या खेळाडूंचे शिस्तबद्ध वागणे, चांगला खेळ व एकजूट पाहून साताऱ्याचे क्रीडाधिकारी श्री. नितीन तारलकार तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सावनत्रे यांनी खेळाडूंचे तसेच प्रशिक्षक महेश मिलके यांचे विशेष कौतुक करून आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 18-10-2024