चिपळूण : शहरातील प्रमुख महामार्गावर मंगळवारी (दि.५) सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास शालोम हॉटेलसमोर टेम्पो उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दरम्यान, काही वेळाने महामार्गाची वाहतूक सुरळीत झाली.
या मार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांनी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस आपत्कालीन सेवांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. उशिरापर्यंत वाहन हटविण्याचे काम सुरू होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 AM 06/Aug/2025














