राजापूर नगर वाचनालयात २० रोजी राज्यस्तरीय काव्य संमेलन

रत्नागिरी : मराठी साहित्य मंडळातर्फे राज्यस्तरीय काव्य संमेलन सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दि. २० रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम राजापूर नगर वाचनालय येथे होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिकडॉ. जयप्रकाश घुमटकर उर्फ कवी गोलघुमट तर उद्घाटक म्हणून उद्योगपती संदीप मालपेकर, स्वागताध्यक्ष राजापूर नगर वाचनालयाचे अध्यक्ष घ्प्रभात पाध्ये उपस्थित राहणार आहेत. कवी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री आकांक्षा निगुडकर (रत्नागिरी) मुख्य अतिथी ज्येष्ठ कवयित्री मा. रेखा दीक्षित (कोल्हापूर) आदी उपस्थित राहणार आहेत. विषेष अतिथी म्हणून संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ कवी सुरेश लोहार (कराड), माजी पोलीस उपायुक्त ज्येष्ठ लेखक विनायक जाधव, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष) सिद्धार्थ कुलकर्णी (मुंबई महानगर प्रदेश अध्यक्ष) ज्येष्ठ कवी राजेश थळकर (रायगड जिल्हा अध्यक्ष) मदन हजेरी (माजी संमेलनाध्यक्ष) आदीच्या मार्गदर्शनाखाली कायक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 18/Oct/2024