रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या शुक्रवारी, दि. ८ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल हद्दीमधील शासनाच्या सर्व खात्यांमधील कार्यालयांकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्यांव्यतिरिक्त ३ सार्वजनिक सुट्या जाहीर करण्याचे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले आहेत.
त्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी ८ ऑगस्ट रोजी ही स्थानिक सुटी जाहीर केली आहे.
ज्येष्ठागौरी विसर्जन निमित्ताने २ सप्टेंबर रोजी आणि नरक चतुर्दशी (अभ्यंगस्थान) निमित्ताने २० ऑक्टोबर रोजीदेखील स्थानिक सुट्यांचे दिवस म्हणून रत्नागिरी जिल्हा महसूल हद्दीकरिता जाहीर केले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 06-08-2025














