जयगड-सडेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड-सडेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुभम प्रकाश चव्हाण (वय ३२, रा. जुनी तांबटआळी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ४) दुपारी तीनच्या सुमारास जयगड-सडेवाडी, स्मशानभूमी येथील शेडच्या पाठीमागील बाजूस निदर्शनास आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 06/Aug/2025