माध्यमिक शिक्षणाधिकारीपदी एकनाथ आंबोकर यांची नियुक्ती

रत्नागिरी : येथील रिक्त असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर एकनाथ आंबोकर यांची नियुक्ती झाली आहे. ते सोमवारी (ता. ११) पदभार स्वीकारणार आहेत. ते सध्या कोल्हापूर येथे योजना शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते.

सुवर्णा सावंत यांची बदली झाल्यानंतर रत्नागिरीतील माध्यमिक शिक्षणाधिकारी हे पद रिक्त होते. प्रभारी पदभार प्राथमिकच्या उपशिक्षणाधिकारी श्रीमती शिरभाते यांच्याकडे होता. या रिक्त पदावर यांची एकनाथ आंबोकर झाल्याचे नियुक्ती पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. आंबोकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदावर फेब्रुवारी २०१५ ते ऑगस्ट २०१८ या कालावधीत काम पाहिले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 06/Aug/2025