खेड : आंबवली विभागात वीज कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रखडल्या

खेड : तालुक्यातील आंबवली विभागातील वडगाव खुर्द, वडगाव बुद्रुक जाधववाडी, कळंबणी खुर्द, बिरमणी आणि कांदोशी या सहा गावांमध्ये गेल्या आठ महिन्यांपासून वीजविभागाचा कोणताही कर्मचारी नियुक्त केलेला नाही. त्या गावांमधील वीज व्यवस्थापनाचा तात्पुरता भार अन्य गावांतील कर्मचाऱ्यांकडे दिला आहे. त्यामुळे समस्या अधिक वाढली असून, तांत्रिक दुरुस्त्या वेळेवर न होणे, विजेच्या तक्रारींकडे दुर्लक्ष, वीजपुरवठ्यातील व्यत्यय यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

गेल्या ८ महिन्यांपासून आमच्या गावात वीज कर्मचारीच नाही. ट्रान्स्फॉर्मर जळाला तरी दुरुस्तीला विलंब होतो. याबद्दल तक्रार कुणाकडे करायची, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. गंभीर स्थिती असतानाही कायमस्वरूपी वीज कर्मचारी नियुक्ती का केली जात नाही? अशा शब्दात संताप व्यक्त करत स्थानिक प्रशासन आणि महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. महावितरण विभागाने त्या गावांकडे दुर्लक्ष केले असल्याची नाराजी ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 06/Aug/2025