चिपळूण : परशुराम घाटाची आमदार शेखर निकम यांच्याकडून पाहणी

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात संक्षरक भिंत कोसळल्यामुळे येथील मार्ग धोकादायक बनला आहे. आमदार शेखर निकम यांनी कोसळलेल्या संरक्षक भिंतीची पाहणी केली.

गतवर्षी पावसाळ्यात परशुराम घाटातील रस्ता काही ठिकाणी खचला होता. तेथे नव्याने काँक्रिटीकरण करण्यात आले. यावर्षीही पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार घडत होते. मात्र परतीच्या पावसात संरक्षक भिंत कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भिंत नेमकी कशामुळे कोसळली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा प्रकार घडल्यानंतर आमदार शेखर निकम यांनी घाटाची पाहणी केली.

ते म्हणाले, परशुराम घाट हा प्रवाशांसाठी महत्वाचा मार्ग आहे. या ठिकाणी संरक्षक भिंतीचा काही भाग खचल्यामुळे वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी दखल घेतली जात आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना केली पाहिजे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तसेच घाटातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या कामाकडे विशेष लक्ष आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 18/Oct/2024