भरणेनाका परिसरात कंटेनर-रिक्षाचा अपघात

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणेनाका येथील पोस्ट ऑफिससमोर काल दुपारी चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या रिक्षाला पाठीमागून धडक दिली. सुदैवाने, या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच श्री जगगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणिजधाम यांच्या रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि वेळेवर मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 06/Aug/2025